मुख्यपृष्ठBTC / USD • क्रिप्टोकरंसी
add
बिटकॉईन (BTC / USD)
याआधी बंद झाले
९४,५१८.४४
बाजारपेठेच्या बातम्या
बिटकॉईन बद्दल
बिटकॉईन हे एक डिजिटल चलन आहे. या चलनाद्वारे पैसे जगभरात पाठवता येतात. ही एक क्रिप्टॉग्राफी प्रकारातील हॅशींग ही कल्पना वापरून तयार केलेली योजना आहे. बिटकॉईन सुरक्षित, जागतिक आणि करमुक्त चलन आहे यावर काही लोकांचा विश्वास बसल्याने या चलनाची लोकप्रियता आणि मूल्य वाढते आहे. इ.स. २१४० मध्ये नवीन बिटकॉईन निर्माण होण्याचे थांबणार आहे असे मानले जाते. ऑगस्ट २०१३ अखेर जगात बिटकॉईन ने होणाऱ्या व्यवहरांची संख्या 1.5 बिलियन डॉलर गेली होती. हे एक आभासी चलन आहे. अनेक देशात याला कायदेशीर रित्या मान्यता नाही. बिटकॉईन साठवणे अगदी सोपे आहे. बिटकॉइन हे एक डिझीटल आभासी चलन आहे, विकेंद्रित पद्धतीने इंटरनेटचा वापर करून बिटकॉइन द्वारा व्यवहार करता येतात, बिटकॉइनवर नियंत्रण ठेवण्यासाठी कुठलीही केंद्रीय संस्था नाही, व्यवहारांच्या संख्येवरून लेजर नावाचे यंत्र बिटकॉइनची किंमत, मागणी व पुरवठा ठरविते वस्तु विकणारा आणि घेणारा व्यक्ती व्यवहार करण्यासाठी बिटकॉइनचा वापर करतात म्हणजे वस्तू विकणाराच्या खात्यावर त्या वस्तूच्या किमतीइतके बिटकॉइन पॉईंट्स जमा होतात, हा विक्रेता दुसरी एखादी वस्तु घेणार असेल, तर तो या बिटकॉइन पॉईंट्स मधून खर्च करतो. प्रत्येक देशाचे एक चलन असते. आपल्या देशाची करन्सी म्हणजेच चलन रुपया आहे. Wikipediaयुनायटेड स्टेट डॉलर्स बद्दल
अमेरिकन डॉलर हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने या राष्ट्राचे अधिकृत चलन आहे. तसेच भारतासह इतर अनेक राष्ट्रांत ते राखीव साठा चलन म्हणूनदेखील वापरले जाते. या चलनाच्या वितरणाचे नियंत्रण अमेरिकेच्या केंद्रीय रिझर्व बँक या संस्थेद्वारा केले जाते. या चलनासाठी $ हे चिन्ह सामान्यतः प्रचलित आहे. तसेच, ISO 4217 प्रणालीनुसार अमेरिकन डॉलरचे चिन्ह USD असे असून, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनुसार US$ असे आहे.
१९९५ साली ३८० अब्ज डॉलर चलनात होते, व त्यापैकी दोन-तृतीयांश हे अमेरिकेबाहेर होते. एप्रिल २००४ च्या अंदाजानुसार, सुमारे ७०० अब्ज इतके डॉलर चलनात होते, व तेव्हासुद्धा त्यापैकी सुमारे अर्धे ते दोन-तृतीयांश हे अमेरिकेबाहेर होते.
अमेरिका हा डॉलर या नावाचे चलन वापरणार्या अनेक देशांपैकी एक आहे. तसेच, अनेक राष्ट्रांमध्ये अमेरिकन डॉलर हे अधिकृत चलन आहे किंवा व्यवहारासाठी वैध चलन म्हणून मान्यताप्राप्त आहे. Wikipedia